बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७१,७२० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६५, ७४३ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ८२८ रुपये आहे तर १ किलो चांदी ८२,७२० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे दर स्थिर दिसून आले. विशेष देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर स्थिर असल्याने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही हे दर एकसारखे आहेत. आदल्या दिवशीचा म्हणजे ३ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१, ७२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ८२,७५० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर जैसे थेच आहेत.