गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गणेशोत्सवा दरम्यान मात्र सोने चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले. १३ सप्टेंबर २०२४, शुक्रवारी सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली. १० ग्रॅम सोने ७३,८१० रूपयांना आणि चांदी ८९,१६० रुपये किलो होती. सोने चांदीच्या वाढलेल्या दराची सध्या सगळीकडे चांगलीच चर्चा होत आहे.